महाराजा समर्ता
आज तू देव रवळनाथ
तर म्हाराजा आज तुकां सांगणां करतों आसों
गांव संबंधान् देसधाम् रोगराय तू आज एशीक बांध
गांवार रखवाली खरी कर
आपली सेवाचाकरी करून घे
या परमाणा तू रवळनाथ राजी जा
नारायेनाची समजी घाल
कल्याण पुरसाक् भुमकेच्या बिरामनाक्, करडया
बिरामनाक्, परबूपर्वसाक्, बारांच्या घाडवसाक्
राज्याच्या घाडवसाक, खासा चवाठो
या परमानां तूं रवळनाथ राजी जा,
पावनायक् राजी कर, पावनायच्या पूर्वसाक
खनरबे भावयेक्, वऱ्या बांधयाक् आदिनारायाणाक्
मायेक् राजी कर, मायेच्या पूर्वसाक्, बारांच्या
पूर्वसाक्, रामेसरा जैनाक, कानोबा भरगिऱ्याक
गिऱ्या गावडयाक्, सांतेरी स्थानपुरुसाक
जैन महालक्ष्मीक् आज घोंगडयाचीतू
समजूत घाल, पूर्वेच्या गुंडयाचा गणित पुरा कर,
बारा पाचांचा गणित याक् कर, देसधाम दूर कर
आणि सेवाचाकरी करून घेरे म्हाराजा,
या गाऱ्हाण्यांत “बारा पाचांचा गणित याक् कर” असे जे म्हटले आहे त्याचा निश्चित अर्थ उपलब्ध नाही. श्री. नि. वि. नाईक यांनी आपल्या ‘दक्षिण कोकणातली देवस्की’ या आपल्या पुस्तकात ह्या बारा स्थळांची नामावली अशी दिली आहे. १) बारांचे कुळ पंचायतन (बाराचा पूर्वस), २) बारांचे स्थळ पंचायतन (देवी, भैरव, वेताळ, गिरोबा, रवळनाथ अशा देवतांपैकी), ३) बारांचा नितकरी (येथे चाळा असतो तेव्हा बळी देण्याची चाल आहे) ४) बारांचा ब्राम्हण ५) बारांचा चव्हाटा ६) रवळनाथ स्थळ ७) सांतेरी (बहुधा या देवतेचे प्रतीक म्हणून वेदी असते. ही वेदी मृण्मय असते. जेव्हा पाषाणी मूर्ती असते तेव्हा तिचे स्वरूप महिषासुरमर्दिनीचे असते.) ८) भूतनाथ किंवा वेताळ ९) रामपुरुष खातया देव (याची भजणूक सुतार वंशावळीकडे असते) १०) जैनमत (भारतातून जैनमताचा पाडाव झाला त्याची स्मृती म्हणून या स्थळाची निर्मिती आहे. भजणूक बहुधा मडवळ (धोबी) वंशावळीकडे असते.) ११) ‘महारगण’ (बाराव्या स्थळाचा उल्लेख पुस्तकात स्पष्टपणे दिसून येत नाही.)
‘बारा पांचा’ पैकी पाच हे श्री. नाईक यांच्यामते वरील यादीपैकी पहिल्या पांच देवता. श्री. पु. रा. बेहरे यांनी आपल्या ‘श्री रवळनाथ आणि कोकणातील देवस्की’ (१९५५) या पुस्तकात ही वरील स्थळे दिली आहेत. परंतु स्थळांचे क्रमांक व नावेही क्वचित वेगळी आहेत.
‘पांच’ हे पूर्वस असावे असे आपले मत असल्याचे श्री. बेहरे म्हणतात. श्री. बेहरे ‘पूर्वस’ या शब्दाचा अर्थ लावताना म्हणतात तो शब्द ‘मायेचा पूर्वस’, ‘रवळनाथाचा पूर्वस’, अशा देवतांशी किंवा ‘बारांचा पूर्वस’ अशा अनेक कुळांच्या समुदायाशी जोडलेला आहे. म्हणून ‘पूर्वस’ हा शब्द पुरुष या शब्दाचेच रूप असावे असे वाटते. मायेची म्हणजे देवीची स्थापना करणारा भक्त तो ‘मायेचा पूर्वस’. प्रत्येक गावांत या देवदेवतांच्या किंवा स्थळांच्या नावांत थोडाफार फरक असतो.
No comments:
Post a Comment